New in Brisbane?

ब्रिस्बेन मध्ये नुकतेच पाउल ठेवलेल्या किंवा ठेऊ पाहणाऱ्या मराठी (किंवा अमराठी सुद्धा) बंधू-भगिनींना येथील वास्तव्याची सुरुवात कशी करावी याविषयी अनेक शंका अथवा प्रश्न असतील. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ब्रिस्बेन महारष्ट्र मंडळ (BRIMM) सदैव तत्पर आहे.

परदेशात नवीन आयुष्य सुरु करण्यास आपण नक्कीच उत्सुक असाल. परंतु मायभूमीला आणि आप्तेष्टांना सोडून आल्यावर आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा इथेही जपण्याची इच्छा आपल्याला नक्कीच असेल. ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळ आपणास येथील कुटुंबात सामावून घेण्यास उत्सुक आहे. ब्रिस्बेन मध्ये स्थलांतरीत होताना मनात निर्माण होणाऱ्या सर्वसाधारण शंकांचे निरसन करण्यासाठी एक छोटीशी मार्गदर्शनपर पत्रिका खाली देत आहोत.

यापलीकडे जाऊन देखील जर आपल्याला काही शंका असतील तर आमच्या संकेतस्थळावर दिलेल्या Contact us वर निसंकोचपणे आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.

ब्रिस्बेन महारष्ट्र मंडळ !!!

BRIMM