Brimm History
ब्रिसबेन महाराष्ट्र मंडळ, २००४ साली आंनद पिगंळे यांच्याकडील दिवाळी गेट गुगेदरला उपस्थित असलेलेल्या मराठी कुटुंबानी स्थापण्याचा निर्णय घेतला. प्रशांत करमाळकरानी मंडळ स्थापण्यासाठी पुढाकार घेतला. पहीली मिटींग न्यु र्फाम बागेमध्ये झाली.
ब्रिमची सुरूवात २००५ साली झाली. त्याला प्रामुख्याने दोन कारणे आहेत. पहिले कारण इथे असलेल्या मराठी कुटुबियासाठी मराठी संस्कृती आणि भाषेचा ठेवा जपण्यासाठी आणि इथे असलेल्या लहान मुलांना आणि तरूंणाना आपल्या मराठी संस्कृतीची ओळख आणि त्याचे महत्व पटवून देण्यासाठी. दुसरे कारण म्हणजे नविन येण्यारया प्रत्येक मराठी कुटुंबास आणि भारतातून येण्यार्र्या मराठी विद्याथ्यासाठी सर्व परीने मदत करणारी एक आपुलकीची संस्था.
ब्रिमचे नाव ब्रिसबेन महाराष्ट्र मंडळ ठेवण्या मागे एकच उदेश होता की ब्रिसबेन मध्ये येण्यार्या प्रत्येक मराठी माणसांस Internet search केल्यावर मराठी मंडळ ताबडतोब कळावे आणि ब्रिमशी संर्पक साधून मदत व्हावी आणि मराठी संस्कृती जपली जावी.
पहिले वर्ष म्हणजे
२००५–२००६. प्रशांत करमाळकर हे ब्रिमचे पहीले President झाले. प्रथम फक्त १८ सभासदांनी मिळुन ब्रिमची सुरूवात झाली. अनेक अडचणीना तोंड देत ब्रिमचा प्रवास सुरू झाला. ब्रिमची घटना ( Constitution) तयार करण्यात आली. ब्रिमची website वेगवेगळ्या मराठी भुषणाने आणि क्निसलॅडच्या रंगाने नटली. ब्रिमचे बॅक आकाउट उघडले गेले.
पहिल्या वर्षीच गणपती बाप्पांचे पुण्याहुन ब्रिसबेन मध्ये आगमन झाले. अगदी सुंदरसा दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची सुंदर कोरीव मुर्ती विमानात बसुन ब्रिसबेनला आली. भालेराव कुटुंबियानी ही मुर्ती पुण्याहुन आणली. अनेक मराठी कुटुबियाच्या आणि बालगोपाळचेया उपस्थितत आणि सहकार्याने पहीला वहीला गणेश उत्सव आंनदात साजरा झाला.
तसेच दिवाळी पण थाटामाटात साजरी झाली. बाळ गोपाळासहीत सर्वानी विविध गुण दर्शन प्रत्सुत केले.
परंतु पहील्या वर्षी Insurance नसल्यामुळे प्रत्येक कमिटी मेंबेरसना कार्यक्रम करताना व्यक्तीगत जोखीम घावी लागली.
तसेच सुरूवातीच्या काळात अनेक सभासदांनी शारिरीक, मानसिक आणि काहीवेळेस अर्थिक मदत करून ब्रिमची धुरा वाहीली.
२००६–२००७ मध्ये ब्रिमचे President आंनद पिगंळे झाले. यावर्षी ब्रिम कमिटीने public Liability Insurance काढला आणि ब्रिमला incorporation स्वरूप आणण्यासाठी पुष्कळ कायदेशीर गोष्टी परीपुर्ण झाल्या. तसेच स्वत: पिगंळे यांनी ब्रिमचे २ फलक पुण्याहुन महाराष्ट्र आणि कीनस्ल्याडच्या रंगात रंगुन आणले.
ब्रिमनी पहील्यादी पुण्याचे हभप आफळे यांचा कीर्तनांचा कार्यक्रम प्रस्तुत केला. तसेच ब्रिमच्या सभासदांनी पहील्यादी गणपती उत्सावात पु. लं देशपांडे प्रस्तुत मराठी नाटक “ सदु आणि दादु” हे सादर केले.ह्या नाटकाच्या सर्व कलाकाराने नाटकाचा खर्च वाटून घेतला आणि तसेच या कार्यक्रमास सभासद गृहीणीने आनंदाने, स्वखर्चाने आणि स्वकष्टाने उत्तम पदार्थ घरून करून आणले आणि जेवणाचा थाट मांडला. त्यामुळं ब्रिमला अर्थिक साह्य मिळाले.
तसेच ब्रिमच्या वतीने प्रथमच २००७ साली अखिल ॲास्टेलीया मराठी संमेलतात ब्रिमच्या उत्साही कलाकारानी भाग घेतला त्यात मराठी गायनाचा तसेच लावणी नाचाचा आणि मान अपमान ह्या पौराणिक नाटकातील प्रवेश साजरा केला. सर्व कार्यक्रमाचा खर्च आणि रात्रनंदिवस तयारी कलाकारानी केली आणि यशस्वी रीत्या ब्रिमचे प्रधिनिधित्व केले.
२००७–२००८ पुढील वर्षी ब्रिमचे President कै. नितीन पाटील झाले आणि ब्रिमचे कार्य चालु राहीले. गणपती आणि दिवाळीस अनेक बहारदार मराठी आणि इतर विविध गुण कार्यक्रम प्रत्सुत झाले.
नंतरची दोन वर्षे २००८ ते २०१० महेश धारगळकर त्यांनी ब्रिमची धुरा President म्हणून संभाळली. त्यांनी प्रथमच मुबंई येथील कथक नृत्यगंना यांचा कायक्रम प्रस्तुत केला.
२००९ साली ब्रिमनी पहील्यादी भारतातून कलाकारास ब्रिसबेन मध्ये दिवाळी कार्यक्रम करण्यासाठी व्हिसा sponser केला.
त्या वर्षी पहिल्यादी येथील मराठी तरूण मंडळीनी दिवाळी उत्सवात भाग घेऊन बहारदार कार्यक्रम साजरा केला. ह्या कार्यक्रमात भारतातून आलेल्या मराठी विद्दार्थानी पण भाग घेतला होता.
तसेच ब्रिमने FICQ म्हणजे कीनस्ल्याड अखिल भारतीय मंडळांचे सभासद बनून ब्रिमच्या सभासदांनी मराठी नाचाने म्हणजे लावणी नृत्याने बहार आणली आणि हा कार्यक्रम city hall मध्ये झाल्यामुळे सर्व भारतीय आणि ॲास्टेलीयन प्रेक्षकांची वाहवाह मिळवली आणि आता मराठी संस्कृतींचा प्रसार ब्रिसबेन मध्ये इतरत्र सुरू झाला.
नतंर
२०१०–२०११ या वर्षी अंजली पिंगळे ह्या प्रथमच ब्रिमच्या पहील्या मराठी स्त्री अध्यक्षा झाल्या. यावर्षी ब्रिमचे सभासदत्व ६० पर्यंत पोहोचले.
त्यांवर्षी पहील्यादी ब्रिमनी पुण्याचे जादुगार रघुवीर यांचा लहान मुलानं साठी आणि पालकासाठी जादुचे प्रयोगाचा क्रार्यक्रम सादर केला. तसेच गणपतीला पुजेनतंर ब्रिसबेनचे नामवंत तबलावादक धीरज श्रेष्टा यांचा कार्यक्रम झाला आणि दिवाळी कार्यक्रम विविध गुण दर्शनाने पार पडले.
तसेच पहील्यादी ब्रिमच्या कमिटी सदस्यांना Queensland Premier ने आमंत्रण देऊन Parliament House मधील होणार्र्या सार्वजनिक दिवाळी उत्सवास बोलाविले. तेव्हाच्या Premier Anna Beigh यांनी मुंबई आणि मराठी लोकंची खुप स्तुती केली होती.
तसेच त्यावर्षी पासुन ब्रिमला Queensland State Government कडून गणपती उत्सवासाठी देणगी मिळायला लागली.
तसेच वंदना गुप्ते आणि राणी वर्मा यांनी प्रत्सुत केलेले “ती” हे व्यवसायीक नाटक ब्रिमने प्रद्रशीत केले.
अतुल कुलर्कणी सारख्या मराठी नामांकीत नटाबरोबर ब्रिमच्या सहयोगाने गप्पागोष्टी आवोजित करण्यात आल्या होत्या.
अश्याप्रकारे ब्रिमची जबाबदारी आणि सभासदत्व हळुहळु वाढू लागले.ब्रिमचा कारभार वाढला आणि विकास वेगाने होऊ लागला आणि त्यास प्रत्येक सभासदाने मनापासून हातभार लावला आणि ब्रिमचा विकास होण्यासाठी हीरीरीने मदत केली.
ब्रिमचे आता बालवस्थेतुन शिशुवस्थेत रूपांतर झाले होते आणि ब्रिमच्या पुढील यशस्वी वाटचालीला सुरूवात झाली.
२०११
BRIMM स्थापन होऊन ६-७ वर्षात संस्थेने चांगलंच बाळसे धरले होते ,… बरेच मराठी लोक Brisbane मध्ये स्थलांतरित झाले होते पण मराठी मंडळ पासून दूरच राहत होते…
त्यामुळे मंडळासमोर मुख्य प्रश्न होता तो लोकांना मानाने कसे जोडता येईल आणि लोकांना हे मंडळ आपले कसे वाटेल ?
तेंव्हा सर्व प्रथम मराठीतून लोकांशी महिन्यातून एकदा असा नित्य नेमाने पत्र व्यवहार सुरु केला … लोकांसमोर मंडळाचे मनोगत मांडण्यास सुरु केले..
“मतभेद का असेनात, भांडायला का होईना पण एकत्र येऊया ” हा विचार रुजवायला सुरुवात केली आणि कुठे तरी मराठी मनाला हि हाक ऐकू गेली आणि लोक एकत्र येऊ लागले …
लोकांची एक तक्रार होती कि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करणे कठीण होते कारण सर्व कार्यकारिणी ऐच्छिक होते आणि कोणाला स्वतःचे वैयक्तिक दूरध्वनी कोण्या परक्याला देणे उचित वाटत नव्हते ,,, तेंव्हा २०११ साली एक मोठे पाऊल उचलले गेले …
मंडळाच्या सांकेतिक स्थळावर प्रमुख कार्यकारिणीचे दूरध्वनी प्रकाशित करण्यात आले जेणे करून कोणाही मराठी माणसाला कोणत्याही वेळी मदत हवी असल्यास खुशाल प्रमुख कार्यकारिणी ना संपर्क करू शकतील … लोकांना मंडळाकडून हीच मदतीची तत्परता अपेक्षित होती !
मग विचार आला कि आपण मोठी माणसं तर आपल्या मातीत रुजलोत पण तरुण पिढी मागे राहता कामी नाही … लहान मुलांना लहान वयातच मराठी ची गोडी लागणे महत्वाचे आहे … मग मंडळाने मराठी शाळा स्थापन करण्याचे ठरवले आणि उत्साही कार्यकर्त्यांनी मराठी शाळा सुरु हि केली … त्याला उदंड प्रतिसाद मुलं आणि पालकांना कडूनही लाभला … आणि आजी आजोबांचा नातवंडांशी मराठी तुन संवाद साधण्याचा मार्ग सुकर झाला !
जस जसा लोकांचा उत्साह वाढू लागला तेंव्हा मंडळाने ठरविले कि लोकांना अजून जास्त जवळ आणावे आणि त्या हेतूतून स्थानिक कलाकारांचेच कार्यक्रम जोरात करायचे ठरविले … मंडळात सर्वच कार्यकर्ते आणि कार्यक्रमातील सहभागी कलाकार सर्वच हौशी आणि ऐच्छिक होते; मेहनत सर्वच जण जोमाने करत होते … मग त्या सर्वांचा उत्साह वाढावा म्हणून कार्यकर्ते आणि कलाकार ह्यांचा कार्यक्रमा दरम्यान छोटेशी भेट देऊन गौरव करण्याची प्रथा सुरु केली .. ह्यामुळे लोकांचा उत्साह खूप वाढला आणि लोकांना मंडळ कुटुंबाचाच एक भाग वाटू लागले… कार्यक्रमांना लोकांची फक्त उपस्थितीच वाढली नाही; तर Brisbane मधील मराठी लोक हळूहळू मनाने मंडळाशी एकरूप होऊ लागली … एकोपा वाढू लागला
जसं मंडळ मोठं होत होतं तसे मंडळाला जास्त ठळक मूर्त स्वरूप देण्याची गरज भासू लागली. … तेंव्हा ठरविले कि मंडळाचे संकेतस्थळ अजून जास्त सभासद केंद्रित करावी आणि मंडळाची प्रतिमा (लोगो) हि विकसित करावी … त्या नुसार प्रथमच मंडळातील कार्यकर्ते जे संगणक व्यावसायिक हि होते त्यांनी पुढाकार घेत एक अत्यंत सभासद केंद्रित, वापरण्यास सुलभ,व्यावसायिक आणि आकर्षक संकेतस्थळ आणि प्रतिमा विकसित केली जी सर्वच सभासदांसाठी एक अभिमानाची गोष्ट ठरली !
२०१५ ते २०१७
या काळाआधी ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळ विविध बाजुंनी स्थिरावले होते. आता ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाला एक ओळख हवी होती थोडक्यात एक ब्रॅन्ड सारखी इतर भारतीय समाज किंवा तसेच ऑस्ट्रेलियातील लोकांनी बघितले पाहिजे, हे काम ह्या विविध माध्यमातून या काळात झाले.
ह्या काळात मंडळाने मराठी कुटूंबाबासाठी एक कौटूंबिक सहल (पिकनिक) आयोजित केली आणि ह्या सहलीचा मुख्य उद्देश होता ते गप्पा गोष्टी,विविध स्पर्धा व भरपूर मज्जा. आणि यातच मंडळाने सगळ्यांना चहा, नाश्ता व दुपारच्या जेवणाची पण सोया केली होती, म्हणजे सगळ्यांनी नुसते निवांत यायचे व भरपूर मज्जा करून आनंदाने घरी जायचे. प्रथम प्रयत्नात जवळ जवळ २५० मराठी भाषिक एकाच पार्क मध्ये जमले व सगळा पार्क मराठीमय झाला आणि हीच परंपरा पुढे चालू आहे.
भारतातून दरवर्षी हजारो कुटुंब व विद्यार्थी ब्रिस्बेन स्थलांतरित होतात, ह्या सगळ्याचे खूप छोटे छोटे प्रश्न व गरजा असतात हे लक्षात घेऊन मंडळाने Meet & Greet नावाचा उपक्रम चालू केला, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळाने व ब्रिस्बेन मधील जुन्या व जाणकार कुटुंबांनी नवीन कुटुंबाना व विद्यार्थ्यांना स्थिर होण्यासाठी,नोकरी शोधण्यासाठी तसेच इतर प्रश्नासाठी मदत केली.
मंडळ आता सगळ्यांना माहित झाले होते व एक ब्रॅन्ड झाले होते आता मंडळाला सगळ्यांना एकत्र कसे ठेवायचे यात लक्ष्य घातले. यासाठी मंडळाने दर २ महिन्याला एक दर्जेदार चित्रपट दाखवले तसेच १५ ऑगस्टला इंडिया डे परेड मध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.
आपल्या मराठी संगीताचा या शास्त्रीय संगीताचा प्रसार व ओळख नवीन पिढीला होण्यासाठी मंडळाने श्री. महेश काळे व राहुल देशपांडे अश्या दिग्गज कलावंताचे कार्यक्रम आयोजित केले व ब्रिस्बेनवासीयांनी याचा पुरेपूर आस्वाद घेतला.
आपले दरवर्षीचे गणपती व दिवाळीचे कार्यक्रम मंडळ दणक्यात साजरे करून मराठी बांधवांना आपल्या विविध गुण सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते.
ह्याच काळात मंडळाने महिलांसाठी संक्रांतीचा कार्यक्रम चालू करून संक्रांतीचे वाण लुटण्यासाठी महिलांना आमंत्रित केले आणि हा वाण लुटण्याचा कार्यक्रम दरवषी होतोच
अश्या आणि अनेक विविध माध्यमातून मंडळ Queensland मधील मराठी समाजाला एकत्र आण्यासाठी अथक परिश्रम केले व यात सगळ्या मराठी कुटुंबांनी मंडळाला साथ दिली. तसेच इतर समाजाने सुद्धा ब्रिम्मला एक महत्वाचे स्थान दिले आणि असेहे ब्रिस्बने महाराष्ट्र मंडळ मराठी समाजाचे केंद्रबिंदू झाले व सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवले.
२०२१ ते २०२२
ब्रिम्मच्या कार्यकारी समितीने Collaboration (सहकार्य) आणि Compliance (अनुपालन) यावर मुख्यत्वे भर दिला. Covid -19 च्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे काही कर्यक्रम होऊ शकले नव्हते. कार्यकारी समितीने आरोग्य विभागाच्या दिशानिर्देशनाचे पालन करीत वार्षिक सहल, गणपती उत्सव आणि ईतर कार्यक्रम प्रस्तुत केले. सर्व सभासदांनी नियमांचे पालन करीत कार्यक्रमांना अतिशय सुंदर प्रतिसाद दिला. ब्रिम्मची आपली मराठी शाळा स्वयंसेवकांच्या हातभराने अविरत चालू आहे.
सचिव श्री गणेश देशपांडे यांच्या पुढाकाराने, ब्रिम्मच्या घटनादुरुस्तीचे काम हाती घेतले गेले. अध्यक्ष श्री जितेंद्र वोमबाथकेरे, कोषाध्यक्ष श्री संदीप मोझर, श्री अमोल दाभोलकर, आणि श्री सुयोग कुलकर्णी यांच्या सहकार्याने घटनादुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि मंडळाच्या AGM २०२२ मध्ये संपूर्ण बहुमताने घटनादुरुस्ती मंजूर झाली.
याचवर्षी आधुनिकीकरणाची अनेक कामे हाती घेतली गेली. ब्रिम्मचा संवाद व्यासपीठ (Communication Platform), सामाजिक माध्यम (Social Media Platform), संकेतस्थळ (BRIMM Website) हि त्यातील ठळक उदाहरणे.
२०२२ ते २०२३
या वर्षी कार्यकारी समितीने कामाचे खालील सहा सुत्रयोजना स्वीकारल्या. ब्रिमने हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा उपक्रमात एक किंवा अधिक सुत्रयोजना संलग्न असेल.
Collaborate (सहयोग), Commit (वचनबद्धता), Comply (अनुपालन), Involve (सहभाग), Invest (गुंतवणूक), Innovate (नाविण्य)
ब्रिम्मचे वार्षिक कर्यक्रम अतिशय थाटात पार पडले. वार्षिक सहल, गणेश उत्सव, दिवाळी, तसेच केवळ स्त्रियांकरिता मकर संक्रांति कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले.
ब्रिम्मने या वर्षी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्री मंदार गाडगीळ यांच्या मंत्रमुग्ध गायनाने साकार केला.
आपली मराठी शाळा आता गार्डन सिटी लायब्ररी आणि अशग्रोव्ह लायब्ररी येथून सुरु आहे.
मराठी आकाशवाणी… आपली वाणी… आपली गाणी… हा नवीन मराठी रेडिओ कार्यक्रम सुरु केला. रेडिओ 4EB 98.1 FM वर प्रत्येक गुरुवारी रात्री ०९:०० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होतो.
तंत्रज्ञान आधुनिकीकरणाची अनेक कामे हाती घेतली गेली आणि पूर्णत्वास नेली.
२०२3 ते २०२4
We continued to deliver our programs/initiatives in accordance with our themes – Collaborate, Commit, Comply, Involve, Invest, Innovate. Celebrating 18 years of Community Services was the theme for this year. BRIMM was established in 2005. All our events celebrated the 18 years theme for this year. Annual Events like Community Picnic, Ganesh Festival, and Ladies only Makar Sankranti events were successfully executed with an enthusiastic participation by our members. We hosted classical vocal musical program, Marathi movie screenings, and collaborated with other Associations as a part of a broader multicultural community. Health & Wellbeing was an integral part of our events had a space for this activity. BRIMM is continuing with its flagship program ‘Apali Marathi Shala’. Now the Shala is operating from four locations. Please contact us if you are interested in participating in this initiative. BRIMM has continued the modernisation journey and have significantly invested in systems upgrade to provide a better experience to our members, sponsors, partners, and supporters. A contract has been signed to modernise our Financial process and it will offer benefits in the coming years. We have continued to strengthen our social media presence. Our FB group has about 2000 members. We focused on better utilisation of Instagram account with the help of the younger generation. BRIMM established WhatsApp group. We put special focus on supporting this group by assisting them to settle in the new environment and promote their collaboration with other community members. Volunteers are our assets and we have built a great pool of volunteers. BRIMM has and will continue to support volunteers by helping them build their skills. Care & Recognition were the key factors building such a great pool and we have consistently ensured our Volunteers are recognised appropriately for their selfless services toward the community. Weekly Marathi Akashwani program on Radio 4EB 98.1FM on each Thursday 09:00pm. MHJ Live in Brisbane Event observed around 430+ attendees during the event and 40+ during the Meet & Greet with the Artists. With your support, this event has set a new benchmark in BRIMM’s history.